कंपनीत कर्मचारी आणि कंपनीतील उच्चपदावरील अधिकारी यांच्यात वाद होण्याच्या घटना घडत असतात. पण आता बेंगलोरमध्ये असे काही घडलं आहे, ज्यामुळे संपुर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. एका कर्मचाऱ्याने कंपनीतील दोन बड्या अधिकाऱ्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे.
एका कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये घुसून कंपनीच्या दोन बड्या अधिकाऱ्यांची हत्या केली आहे. बेंगलोरमधील एका टेक कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकाची हत्या त्या कर्मचाऱ्याने केली आहे.
सीईओ विनू कुमार आणि एमडी फणींद्र सुब्रमण्यम अशी मृतांची नावे आहे. आरोपी हा हत्या करुन सध्या फरार झाला आहे. फेलिक्स असे त्या आरोपीचे नाव आहे. फेलिक्स आधी त्याच कंपनीत काम करत होता. पण नंतर त्याने ते काम सोडून दिले होते.
फेलिक्सने कंपनीतून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. पण विनू कुमार आणि फणींद्र सुब्रमण्यम हे त्याच्या कामात अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे संतापलेल्या फेलिक्सने त्या दोघांचा जीव घेतला आहे.
संबंधित घटना घडली तेव्हा विनू कुमार आणि फणींद्र हे दोघेही आपल्या ऑफिसमध्ये होते. त्यांना मारण्यासाठी फेलिक्सने प्लॅन बनवला होता. त्याने तलवार आणि चाकू शर्टमध्ये लपवून आणला होता. त्यानंतर तो थेट त्यांच्या केबिनमध्ये गेला आणि तलवारीने त्यांच्यावर वार केले आणि त्यांची हत्या केली.
वार करत असताना ते दोघेही स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण रागात असलेल्या फेलिक्सने दोघांचीही हत्या केली. त्यानंतर तो तिथून फरार झाला आहे. आरोपी फेलिक्स हा रिल्स बनवत असल्यामुळे तो चांगलाच चर्चेत असायचा. सोशल मीडियावरही त्याचे चांगलेच फॉलोवर्स आहेत.