फडणवीसांनी चार्टर्ड प्लेन पाठवलेला नेता शरद पवारांच्या भेटीला, वस्तादाने अखेर डाव टाकलाच…

सध्या भाजपमध्ये नाराज असलेले नेत्यांची शरद पवार मोट बांधत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांची घरवापसी घडवून आणणारे राजकारणातले वस्ताद शरद पवार आता माढ्यात पुन्हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नेते उत्तमराव जानकर हे भाजपवर नाराज आहेत. यामुळे ही नाराजी शरद पवार यांनी ओळखली आहे. भाजपने आपल्याला माढ्यातून निवडणुकीची तयारी करायला सांगितली होती. पण उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे आपले कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे शरद पवारांकडे ते जाणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत परतलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा विचार जानकरांकडून सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांसाठी बारामतीला स्पेशल चार्टर्ड प्लेन पाठवले. तसेच चर्चेला बोलावले. मात्र त्यांची नाराजी दूर झाली नसल्याची माहिती आहे.

यामुळे नंतर उत्तमराव जानकर शरद पवारांची भेट घेतली. यानंतर उद्या ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामुळे उद्या माढा लोकसभा मतदार संघात राजकीय भूकंप घडणार असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांसोबत बोलून १९ एप्रिलला निर्णय घेऊ, असे जानकरांनी सांगितले आहे.

आम्ही कुठे जाणार ते आम्हालाच माहिती नाही. आम्हाला समजलं की तुम्हाला सांगतो, असं जानकर म्हणाले. यामुळे आता उद्या नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यावर माढ्याचे मोठे गणित अवलंबून असणार आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात मोहिते नाराज आहेत, रामराजे निंबाळकर नाराज आहेत, आता जानकर देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात अजून काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.