फडणवीसांचा सर्वात जवळचा नेता हातात घेणार तुतारी, शरद पवारांनी सगळं राजकारणच फिरवल…

राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सामना होणार आहे.

असे असताना या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचा बडा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मर्जीतले नेते आता शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या उपस्थितीत ते हातात तुतारी घेणार असल्याची माहिती आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचे समजत आहे. उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित आहे.

सप्टेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनिती आखल्याचे बोलले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.