आयुर्वेदिक काढा पिणं पडलं महागात, एका रात्रीत संपलं बाप-लेकाचं आयुष्य; साताऱ्यात खळबळ

बऱ्याचदा आजार झाला की लोक डॉक्टरांकडे जात नाही. तर काही लोक घरगुती उपाय करुन आपला आजार बरा करण्याचा प्रयत्न करत असतात. पण घरगुती उपाय हे धोकादायक ठरु शकतात असे डॉक्टर म्हणत असतात.

अनेकदा घरगुती उपाय करणाऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, तर काही लोकांना साईड इफेट्सही होतात. पण आता साताऱ्यामधून अशी एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये आयुर्वेदिक काढा पिल्याने बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. रात्री जेवण झाल्यानंतर बाप-लेकाने ते औषध पिले होते. पण त्यानंतर ते झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. पण या संपुर्ण घटनेने साताऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हनुमंंतराव पोतेकर असे वडिलांचे नाव आहे, तर अमित पोतेकर हे मुलाचे नाव आहे. घरात हा एकुलता एकच मुलगा होता, तर हनुंतरावही घरातील प्रमुख होते. त्यामुळे असा प्रकार घडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हनुमंतराव आणि अमित यांनी कुटुंबासोबत जेवण केले होते. त्यानंतर अमित, हनुमंतराव आणि हनुमंतरावांच्या मुलीने तो आयुर्वेदिक काढा पिला. तो काढा पिऊन ते झोपले. पण मध्यरात्रीच्या वेळी त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आयुर्वेदिक काढा पिल्यानंतर त्यांना खुप त्रास होत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिघांवरही उपचार सुरु होते. पण या उपचारादरम्यान हनुमंतराव आणि मुलगा अमित याचा मृत्यू झाला आहे. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले असून पोलिस याप्रकरणी तपास करत आहे.