ईडीकडून अटकेची भिती! मुख्यमंत्र्यांनी केली पत्नीलाच मुख्यमंत्री करण्याची तयारी, राजकारणात खळबळ

सध्या झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान कानके रोड, रांची येथील सभागृहात होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पत्नी कल्पना यांच्याकडे सोपवू शकतात.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला नवे मुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी सीएम सोरेन यांच्यावर आपली पकड घट्ट करण्याचे संकेत आहेत.

त्यामुळेच त्यांनी उद्या एक दिवसानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. गिरीडीह येथील झामुमोचे आमदार सरफराज अहमद यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्याच्या बैठकीत झारखंडच्या राजकारणावर चर्चा होऊ शकते.

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमत झाल्यास हेमंत सोरेन हे त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जाण्याची भीती आहे.

झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान, भाजप नेते बाबुलाल मरांडी यांनी हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधताना एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, झारखंडमध्येही बिहारप्रमाणे जंगलराज आहे. झामुमोचे नेते पुन्हा राज्यात जुन्या टप्प्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.

चारा घोटाळेबाज लालू प्रसाद यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, त्यांच्या सर्व युक्त्या अयशस्वी झाल्यावर त्यांनी राबडी देवींना ‘खडाऊ मुख्यमंत्री’ केले आणि तुरुंगात गेले. आता सीएम हेमंत सोरेन यांना ईडीच्या अटकेची भीती आणि तुरुंगात जाण्याच्या भीतीने पत्नीला मुख्यमंत्री बनवायचे आहे.