वर्गातच पडली, शिक्षकांनी उचललं, रुग्णालयात नेलं पण क्षणात सगळं संपलं, तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू…

सध्या लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याबाबत नुकतीच अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या चिमुकलीला शाळेत खेळता खेळता हार्ट अटॅक आला आणि काही वेळात तिचे निधन झाले.

यामुळे एकच खळबळ उडाली असून अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती अशी की, मुलगी तिच्या वर्गात जाताना अचानक खाली पडली. तिला तिच्या सोबतच्या मित्रांनी उचलण्याचा प्रयत्न केला, पण तिने कोणतीही हालचाल केली नाही. मुलांनी लगेच शाळेतील शिक्षकांना सांगतिले. यानंतर पळापळ झाली.

दरम्यान, वर्गशिक्षेकेने त्या मुलीला उचललं, मात्र तोपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. घटनेनंतर अनेकांनी मोठी गर्दी केली होती. मुलीला लगेच रुग्णालयात दाखल आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामुळे तिच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मुख्याध्यापिका म्हणाल्या, आमच्या शिक्षकांनी मुलीला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मुलीचे आई-वडील आले, त्यांनी मुलीला फातिमा रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेलं. पण तरीही मुलगी वाचू शकली नाही. यामध्ये कोणीही उशीर केला नाही.

मुलीचे आजोबा म्हणाले, की ती आधीही आजारी पडली आहे. पण तिला हृदयसंबंधी काही आजार किंवा त्रास असेल याबाबत कधीही माहिती नव्हतं. मुलीच्या कुटुंबियांनी मुलीचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. या घटनेमुळे सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सध्या लहान मुलांना देखील अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे भविष्यात परिस्थिती अजूनच बिकट होणार आहे. याबाबत आरोग्यासाठी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. मात्र लहान मुलांना देखील अटॅक येत असल्याने परिस्थिती भयंकर होत आहे.