Fire News : मध्यरात्री घडली भयंकर घटना! संभाजीनगरमध्ये ६ कामगारांचा जागीच कोळसा

Fire News : छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या आगीचे कारण अजून समोर आले नाही.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत ही घटना घडली आहे. मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील आहेत. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच होती.  

आगीच वाचलेला अली अकबर म्हणाला, आम्ही सर्वजण कंपनीत झोपलो होतो. कंपनीतील काम देखील बंद झाले होते. आमच्यातील एकजण रात्री बारा वाजेच्या सुमारास आला आणि तो देखील झोपी गेला. थोड्या वेळाने आम्हाला गरम वाटायला लागले.

यामुळे आम्ही उठलो. त्यावेळी कंपनीत आग लागल्याचे आम्हाला दिसले. आम्ही सर्वांना झोपेतून उठवले. बाहेर निघण्याच्या मार्गावरच आग लागल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. यामुळे कुठून बाहेर पडावे असा प्रश्न पडला होता. आम्ही कंपनीत असलेली एक सीडी लावून कंपनीचे वरील पत्र बाजूल करून बाहेर पडलो.

दरम्यान, पत्र्यावर येऊन एका झाडाला धरून आम्ही चार लोकं बाहेर पडलो. मात्र इतर साथीदाररांना बाहेर पडता आले नाही. यामुळे त्यांचा जीव गेला. या कंपनीत रबरी हातमोजे बनवण्याचे काम केले जाते. १५ कामगारांसह एक महिला व दोन लहान मुले काम करतात.

या कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे रहिवासी आहेत. एकजण पश्चिम बंगाल व शेजारच्या गावातील आहे. याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.