Bengaluru news : फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, १२ जणांचा जागीच कोळसा; वाचा नेमकं काय घडलं…

Bengaluru news : शनिवारी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या अणेकल तालुक्यातील अट्टीबेले भागात फटाक्यांच्या गोदामासह-दुकानाला लागलेल्या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुकान मालकासह अन्य चार जण भाजल्याचे वृत्त असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांपैकी बहुतेक जण फटाक्यांच्या गोदामात काम करणारे कर्मचारी होते, त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या अपघातात दुकान मालकासह चार जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक मल्लिकार्जुन बलदंडी म्हणाले, आग लागली तेव्हा काही कर्मचारी दुकानात काम करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

ते म्हणाले की, अपघाताच्या वेळी फटाक्यांच्या गोदामात सुमारे 20 कर्मचारी होते, त्यादरम्यान चार कर्मचारी जीव मुठीत घेऊन बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. मात्र 12 जणांना जीव गमवावा लागला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी X ट्विटवर ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, बंगळुरू शहर(Bengaluru news) जिल्ह्यातील अणेकलजवळील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला खूप दु:ख झाले आहे.

मी उद्या अपघातस्थळी भेट देऊन पाहणी करेन, मृत कामगारांच्या कुटुंबियांना माझ्याकडून संवेदना. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी रात्री घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

शिवकुमार म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी फोनवर बोललो. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

ते पुढे म्हणाले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील फटाक्यांची दुकाने आणि गोदामांमध्ये अग्निरोधक नियमांचे पालन करण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.