पायात अधू, पुण्यातील नोकरी कोरोनात गेली; गाव गाठून सुरु केलं ‘हे’ काम, आता लाखात कमवतोय

Dharshiv Farmer : धाराशिव जिल्ह्यातील एकुरका गावच्या तरुणाने शेतीमध्ये वेगळेपण दाखवत इतर शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी गावाकडे पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करत चांगकेच उत्पन्न मिळवले आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

या शेतकऱ्यांना आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने केळीची बाग फुलवत लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे. यामुळे त्यांना चांगला फायदा झाला आहे. अमोल राजाभाऊ यादव असे त्यांचे नाव आहे. त्यांचे शिक्षण देखील जास्त झाले नाही.

नववीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले असून एक ते पायाने अपंग आहेत. ते पुण्यात ड्रायव्हर म्हणून एक कंपनीत काम करत होते. पुण्यात असताना कोरोना आला आणि त्यांची नोकरी गेली. यामुळे ते गावात आले. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली.

त्यांनी केळीची लागवड केली. पोटच्या लेकराप्रमाणे या केळीच्या बागेची काळजी घेतली, पाणी नसल्याने टँकरने पाणी दिले. त्यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आणि आता केळी विक्रीसाठी दुबई, इराक या देशात पाठवण्यात आली आहे.

यामध्ये त्यांना लाखोंचा फायदा झाला आहे. त्यात कोबीचे अंतर पीक घेऊन त्यातून लाखोच उत्पन्न निघाले आहे. यामुळे त्यांना दुहेरी फायदा झाला आहे. अमोल यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. शासकीय योजनांचा योग्यरीतीने लाभ घेऊन अमोल यांनी शेतीतून समृद्धी साधली आहे.

यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी ते एक आदर्श झाले आहेत. शेतीमध्ये योग्य नियोजन असले तर चांगले उत्पादन मिळवता येते, असेच त्यांनी दाखवून दिले आहे. यामुळे त्यांची सध्या चर्चा सुरू आहे.