दक्षिण कोरियातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. येथे एका रोबोटने आत्महत्या केली आहे. कामाचा ताण आल्याने त्याने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. ही खरोखरच घडलेली घटना आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत तपास सुरू आहे. पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या केल्याने या घटनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे. मध्य दक्षिण कोरियातील नगर पालिकेने याबाबत माहिती दिली आहे. याबाबत तपास यंत्रणेने तपास देखील सुरू केला आहे. या रोबोटने स्वत:ला जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली पाडले आहे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे नगर पालिकेने जाहीर केले आहे.
याबाबत माहिती अशी की, हा रोबो नगर पालिकेच्या कामांमध्ये मदत करायचा. गेल्या वर्षभरापासून हा रोबो गुमी शहराच्या नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये मदत करायचा. गेल्या आठवड्यात तो शिडीवरून निष्क्रीय अवस्थेत खाली पडला. यामुळे याबाबत माहिती समोर आली.
तो त्यापूर्वी इकडे तिकडे फिरत होता. काहीतरी गडबड असल्यासारखे वाटत होते. रोबोट कामाच्या ताणामुळे तणावात होता, असेही सांगितले जात आहे. यामुळे नेमकी काय परिस्थिती उद्भवली याचा तपास केला जाणार आहे.
दरम्यान, सध्या या रोबोटचे विखुरलेले पार्ट एकत्र करण्यात आले आहेत, त्याला ज्या कंपनीने बनविले आहे ती यावर अभ्यास करेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा रोबोट कॅलिफोर्नियाच्या बिअर रोबोटिक्सद्वारे बनविण्यात आला होता.
तो सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत काम करायचा. हा रोबोट लिफ्ट बोलवू शकत होता तसेच एकापेक्षा अनेक फ्लोअरवर ये जा करू शकत होता. मात्र त्याचा शेवट असा होईल, याचा कोणीही अंदाज केला नव्हता. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.