Gautami Patil : नको या मुलींना धंद्याला लावू, तुला अक्कल..! गौतमीच्या ‘त्या’ व्हिडिओवर चाहते संतापले

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील सतत चर्चेत असते. तिच्या डान्सचे लाखो लोक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. त्यातील एक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे हा व्हिडिओ नेमका कोणता आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गौतमीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती काही मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ शेअर करत तिने हात जोडण्याचे इमोजी शेअर करत हसण्याचे इमोजी कॅप्शनमध्ये दिले आहे.

यामध्ये गौतमी मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. मात्र यावरून तिला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी म्हटले आहे की, नको यांना या धंद्या ला लावू. शिवकन्या आहेत त्या तुझ्या सारख्या नाचऱ्या कन्या नाहीत. ‘अग तू नाचली ना बास झालं.

बाक्की च्या मुलींना नको हे धंदे करायला लावू. गौतमी वेडी झाली. तू नाच आणि अजून तुझ्या पुढं 10 तयार कर नाचायला. काय जरातर लाजावं की. गौतमी ताई तुम्ही नाचा. लहान मुली आहेत हो, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

तसेच काहींनी पालकांना दोष दिला आहे. यांच्या पालकांना भावपूर्ण श्रद्धांजली. पोट भरण्यासाठी नाचणं ते पण घाणेरडं हेच नाही आहे शिकली आहे ना आक्का तु जॉब कर की बंद कर धंदे तूझे अनपढ गवार लोकांसारखे काय उड्या मारते.

ही शिकवण देता का तुम्ही मुलांना कुठे चाललाय महाराष्ट्र? अशा वेगवेळ्या प्रतिक्रिया या पोस्टवर अनेकांनी केल्या आहेत. दरम्यान, गौतमी तिच्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फोटो शेअर करत असते. यामुळे याची चर्चा नेहेमी होत असते.