Goa Crime News: कोट्याधीश सूचना सेठनं पोटच्या पोराला कसं संपवलं? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Goa Crime News: चार वर्षाच्या मुलाची त्याच्याच आईने हत्या केली, या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. एका यशस्वी सीईओने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याची ही घटना खरोखरच धक्कादायक आहे. या घटनेची अनेक कारणे असू शकतात, परंतु आईने स्वतःच्या मुलाची हत्या करण्याचे धाडस केल तरी कस? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

गोव्यात एका स्टार्टअप कंपनीच्या सीईओ सुचना सेठ आपल्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. खून करण्यापूर्वी महिलेने आपल्या मुलाला औषधाचा भारी डोस दिला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला सुचना सेठ हिने कथितपणे आपल्या मुलाची गोव्यातील कँडोलिम येथील अपार्टमेंटमध्ये हत्या केली आणि मृतदेह एका पिशवीत भरून टॅक्सीने कर्नाटकला नेला. आरोपी महिलेला सोमवारी (8 जानेवारी) रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करून मंगळवारी (9 जानेवारी) गोव्यात आणण्यात आले.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, मुलाची हत्या उशी किंवा टॉवेलच्या मदतीने गळा घोटून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलाचा मृत्यू पोस्टमॉर्टमच्या 36 तासांपूर्वी झाल्याचेही समोर आले आहे.

सुचना सेठ हिने 2010 मध्ये व्यंकट रमनशी लग्न केले. दोघांना 2019 मध्ये मुलगा झाला. मात्र यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. 2020 मध्ये हे जोडपे वेगळे झाले आणि त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती.

घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये सर्वात गुंतागुंतीचा मुद्दा म्हणजे मुलांच्या ताब्याचा मुद्दा. न्यायालयाने व्यंकट रमण यांना दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. माहिती सेठला दर रविवारी आपल्या मुलाला पतीकडे घेऊन जायचे नव्हते. तिने ते तिच्या अहंकाराशी जोडले आणि ते शांत करण्यासाठी ती राक्षशीण बनली. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.