अभिनेता गोविंदा लढवणार लोकसभा निवडणुक, मतदार संघही ठरला, आतली माहिती आली समोर…

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. आता अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविदांचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे गणित बदलू शकत.

याबाबत लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे. याआधी देखील त्याने निवडणूक लढवली होती. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचे नाव चर्चेत आहे. अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आहे.

लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीचा तपशील अजून बाहेर आला नाही. मात्र यासाठीच ही भेट होती.

उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचे वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, या अनुशंगाने अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा आहे. याबाबत चाचपणी सुरू आहे.

दरम्यान, लवकरच याबाबत सविस्तर माहिती समोर येईल. याबाबत येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सध्या प्रचार देखील इच्छुकांनी सुरू केला आहे.