---Advertisement---

जिम ट्रेनर भाच्याने विचारला ‘तो’ एक सवाल, चिडलेल्या मामीने त्याचा जीवच घेतला, जळगावात खळबळ

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे मामीला मुलीच्या लग्नासाठी दिलेले साडेतीन लाख रुपये परत मागितल्याने वाद झाला. यामुळे मामीने तिचा भाऊ व भाचा यांच्या मदतीने शहरातील जिम ट्रेनर भाच्यावर तलवार आणि चाकूने वार करत करत खून केला आहे.

येथील आझाद नगरात नाजीश शेख नासीर हा तरुण आई-वडील, भाऊ व पत्नी, मुलांसोबत राहत होता. मामी असलेल्या सुलतानाबी मुबारक खान यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्याने साडेतीन लाख रुपये दिले होते. यावरून वाद होत होता.

दरम्यान, नंतर हे पैसे परत मागितल्यानंतर सुलतानाबी यांचा नाजीशसोबत वाद झाला. पुढे हा वाद वाढत गेला. या वादात महिलेच्या भावासह भाच्याने नाजिश याला धमकी दिली होती.

याबाबत नाजीशने आई शर्मिला नासीर यांना ही बाब सांगितली होती. सकाळी नाजीश शेख नासीर हा जिम उघडण्यासाठी घरातून बाहेर पडला. दबा धरून असलेल्या संशयित व महिलेचा भाऊ ईझहार उर्फ अज्जू जलालोद्दीन शेख, भाचा आसीफ दाऊद शेख यांनी तलवारीसह चाकूचे सपासप वार केले.

या हल्ल्यात नाजीश रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी शर्मिला नासीर यांनी धाव घेतल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी नाजीश याला जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत शर्मिला शेख नासीर यांच्या फिर्यादीवरून सुलतानाबी मुबारक खान , ईझहार उर्फ अज्जू जलालोद्दीन शेख व आसीफ दाऊद शेख (दोन्ही रा.आझाद नगर, भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---