Nagpur News : सिग्नलवर थांबलेल्या तरूणीसोबत घडलं भयंकर, डोळ्यादेखत सख्ख्या बहिणीचा तडफडून अंत

Nagpur News : नागपूरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. याठिकाणी मिनीबसने दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या सख्या मोठ्या बहिणीच्या डोळ्यादेखत तिचा मृत्यू झाला.

ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक चौक परिसरात सकाळी नऊ वाजता घडली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. श्रेया जीवन रोकडे असे मृत तरुणीचे नाव आहे. श्रेया आणि तिची मोठी बहीण साक्षी ह्या त्यांच्या ॲक्टिव्हा गाडीने जात होत्या.

तेव्हा ही घटना घडली आहे. साक्षी गाडी चालवत होती. चौकात सिग्नल लागला होता. त्यामुळे त्या सिग्नलवर उभ्या होत्या. यावेळी मिनीबसच्या आरोपी चालकाने त्यांना मागून धडक दिली. त्यांची यामध्ये काही चूक नसताना हा अपघात झाला.

अपघातात श्रेया आणि साक्षी दोघी खाली पडल्या. यात श्रेयाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी श्रेयाला तपासून मृत घोषित केले. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला. साक्षीवर उपचार सुरू आहेत.

श्रेया ही इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला शिकत होती. साक्षी एका खासगी कंपनीत काम करीत असल्याचे कळते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर आरोपी चालकाने गाडी तेथेच सोडली व तेथून पळ काढला. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.

आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी येत वाहतूक व्यवस्थित केली. नंतर कुटूंबाला याबाबत माहिती देण्यात आली. या घटनेत कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.