ज्या हाॅटेलात वडील वेटर होते ते हाॅटेलच घेतले विकत; किस्सा सांगताना सुनील शेट्टी भावूक

अभिनेता सुनील शेट्टी यांच्या कामामुळे तो अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. सुनील शेट्टी यांचे अनेक चित्रपट गाजले. आजही सुनील शेट्टी यांचे चित्रपट प्रेक्षक आनंदाने पाहतात. त्यांच्या चित्रपटाचे आजही अनेक चाहते आहेत. त्याने मोठ्या मेहनतीने या क्षेत्रात करिअर केल आहे. त्यात सातत्याने यश संपादन करणेही सोपे नाही.

सुनील शेट्टी यांनी प्रत्येक आव्हानांना सामोरे जात हे यश प्राप्त केले आहे. त्यांचा संघर्ष हा सोपा नव्हता. त्यांचे वडील हे ज्या ठिकाणी वेटर म्हणून काम करायचे तीच इमारत आता सुनील शेट्टी यांच्या मालकीची आहे, असा खुलासा अभिनेते सुनील शेट्टी यांनी केला आहे. यामुळे त्याचा संघर्ष किती मोठा असेल याचा अंदाज आपल्याला येतो.

एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझे वडील लहानपणी पळून मुंबईला आले. त्यांना वडील नव्हते. त्यांना फक्त तीन बहिणी होत्या. त्यांना वयाच्या नवव्या वर्षी एका दाक्षिणात्त्य भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम मिळाले. त्यांनी प्रामाणिकपणे त्याठिकाणी काम केले.

माझ्या वडिलांचे पहिलं काम टेबल साफ करणं हे होते. ते भाताच्या पोत्यावर झोपायचे. सुनील शेट्टी यांचे वडील हे या हॉटेलमध्ये बरीच वर्षे काम करत होते. आता परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. सुनील शेट्टी हे बॉलिवूडचे स्टार बनले. पैसा आला गाड्या आल्या. आता अनेक ठिकाणी त्यांची घर आहेत.

आजही त्यांचे नाव हे बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. आज त्याच इमारती सुनील शेट्टी यांच्या मालकीच्या आहेत. माझ्या बाबांच्या बॉसने तीन इमारती विकत घेतल्या आणि त्या माझ्या बाबांना सांभाळायला सांगितले. बॉस निवृत्त झाल्यावर बाबांनी तिन्ही इमारती विकत घेतल्या, असेही त्यांनी सांगितले आहे.

माझे बाबा खूप नम्र होते, पण जर कोणी त्यांच्या मुलांबद्दल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात काही बोलले तर ते खूप चिडायचे. ते एकच डायलॉग बोलायचे, ‘मी सगळं काही विकून टाकेन आणि माझ्या गावी परत निघून जाईन पण अन्याय सहन करणार नाही, असेही त्यांनी सांगितली.

सुनील शेट्टी यांचे वडील विरप्पा शेट्टी यांचे सात वर्षांपूर्वी 2017 साली निधन झाले. या मुलाखतीत वडिलांच्याबद्दल बोलताना ते अनेकदा भावुक झालेले दिसून आले. त्यांच्या वडिलांनी मोठा संघर्ष केला, यामुळे त्यांना यामध्ये करिअर करता आलं.