शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे, चुंबन घेऊन…: फोटो पाहून पालक हादरले

शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा हा प्रताप आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शाळेच्या सहलीत विद्यार्थ्याचे चुंबन घेतल्याचा आणि त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप मुख्याध्यापिकेवर आहे. या शाळेची सहल गेली होती. तेव्हा हा प्रकार घडला आहे.

याबाबत एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेचे फोटो आणि व्हिडीओ चित्रित केले. नंतर शिक्षण विभागाने मुख्याध्यापिकेविरोधात निलंबनाची कारवाई केली. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने याबाबत चौकशी लावली आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्याचे आई, वडील शाळेत पोहोचले. त्यांनी मुख्याध्यापिकेविरोधात तक्रार दाखल केली. यामुळे याचा तपास करण्यात आला. त्यानंतर चिक्काबल्लापूरचे शिक्षण उपसंचालकांची या प्रकरणाची दखल घेतली.

मुख्याध्यापिकेने शाळेच्या सहलीत काढलेले काही फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले असल्याचे देखील समोर आले आहे. मात्र तोपर्यंत अनेकांकडे हे फोटो गेले होते. या प्रकरणाचा तपास करुन बीईओंनी अहवाल सादर केला आहे. त्यानंतर मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले.

ही सहल होरानाडू, याना आणि अन्य ठिकाणी गेली होती. याच सहलीत मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचे फोटो दुसऱ्या विद्यार्थ्यानं टिपले. दोन विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता अन्य कोणालाच या फोटोंबद्दल माहिती नव्हती. जेव्हा माहिती झाली तेव्हा अनेकांना धक्काच बसला.