---Advertisement---

‘माणूसपणाची शिसारी आलीय, असे मरण..’; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर अभिनेत्रीने सांगीतले धक्कादायक सत्य

---Advertisement---

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ते फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते.

गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे येथे एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. अचानक त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना फ्लॅटमधून दुर्गंधी यायला लागली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता महाजनी यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळून आला आहे.

रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर मराठी चित्रपटसृष्टीतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी मनोरंजन विश्वासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. तर काही कलाकारांनी त्यांच्यासोबतचे आपले अनुभव शेअर केले आहे.

अनेक मराठी कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसून येत आहे. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हेमांगी कवीने रवींद्र महाजनी यांच्यावर केलेली पोस्ट ही सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

हेमांगी कवीची पोस्ट-
जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी हे गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मीडियावर नंतर न्युज चॅनेलमधून. पण गेल्यापेक्षा ते कसे गेले याच्याच बातम्या सर्वत्र दाखवल्या जात आहे. जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे. पण आता बातमी देणाऱ्यांची ती स्टाईल झाली आहे. त्याशिवाय लोक बातमीच बघत नाही. त्यांचा दोष नाही, प्रत्येकाला पोट असते.

पण त्या बातमीवर आलेल्या कमेंट्स वाचून माणूसपणाची सिसारी आली आहे. ते इतकं अंगावर आली की श्रद्धांजली वाहणं नकोसं झालं. त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नसताना लोक वाटेल ते बोलत सुटले आहे. त्यांच्या मुलाबद्दल पत्नीबद्दल काय काय बोलत आहे. असे मरण अनेकांना येते पण केवळ ते अभिनेते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आहे आपण.

ज्या हिरोला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं खुप Surreal वाटतं मला! ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रविंद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते!गश्मीर महाजनी आधीच इतका स्ट्रगल करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry!
And Strength to you, boy!

Yes, Social Media वर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास!

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---