महाविकास आघाडी वंचित आघाडीला किती जागा देणार? संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा…

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे आता कोणाला किती जागा मिळणार हे लवकरच पुढे येणार आहे. तसेच आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे.

नंतर ते म्हणाले, ही चर्चा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला जाणार आहे. संजय राऊत यांनीच वंचितसाठी किती जागा सोडल्या जातील, याचा खुलासा केला आहे. वंचित बहुजन आघाडीला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे.

या जागांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ असलेल्या अकोला लोकसभेचाही समावेश आहे. यामुळे आता आंबेडकर यावर तयार होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता निर्णय काय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय त्यांचा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

राज्यात मुस्लिम आणि दलित वर्ग यावेळी भाजपला मतदान करणार नाही. वंचित आणि एमआयएमच्या संभाव्य आघाडीवरती संजय राऊत यांनी भाष्य केले. या दोन्ही पक्षांची युती होणार नाही, आम्ही तीन प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्ष सोबत असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची संध्याकाळी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल या बैठकीला हजर राहणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यामुळे आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर आता अंतिम जागावाटप होणार आहे.