---Advertisement---

Pune : हा माझ्याशी वाईट वागला हो, स्वारगेटच्या पीडितेने दत्तात्रयबाबत एकाला सांगितलेलं; तो म्हणाला, वाईट लोक असतातच, पण तू…

---Advertisement---

Pune : पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकात एका सराईत गुन्हेगाराने नोकरीनिमित्त पुण्यात राहणाऱ्या आणि फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केला. ‘ताई, कुठे जायचंय?’ असे विचारत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला आणि दिशाभूल करून एका रिकाम्या बसमध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. घाबरलेल्या तरुणीने काही वेळ कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, नंतर मित्राला सांगितल्यानंतर पोलिसांत धाव घेतली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

विश्वास जिंकून आरोपीने रचला कट

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरी करत असून ती मंगळवारी पहाटे 4:30 च्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्थानकात पोहोचली होती. त्याच वेळी आरोपी बसस्थानकात संशयास्पद हालचाली करत होता. काही वेळाने त्याने तरुणीशी संवाद साधत ‘‘ताई, कुठे जायचे आहे?’’ असे विचारले. ‘ताई’ असे संबोधल्याने तरुणीचा संशय दूर झाला. तिने फलटणला जाण्याची माहिती दिली, तेव्हा आरोपीने ‘‘फलटणची बस दुसऱ्या बाजूला लागली आहे,’’ असे सांगून तिला सोबत येण्यास सांगितले.

बसमध्ये चढण्यास भाग पाडले आणि अमानुष कृत्य

आरोपी तिला एका रिकाम्या बसकडे घेऊन गेला. बसमध्ये अंधार पाहून तरुणीने शंका व्यक्त केली. तेव्हा ‘‘बस उशिरा सुटणार असल्याने प्रवासी झोपले आहेत,’’ असे सांगून तिची समजूत घातली. त्यानंतर त्याने तिला बसमध्ये चढण्यास भाग पाडले. आत गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून घेतला आणि जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. अत्याचारानंतर तो तिथून पसार झाला, तर धक्का बसलेल्या अवस्थेत तरुणी बाहेर आली.

घाबरलेल्या तरुणीने मित्राला सांगितल्यावर उघड झाला प्रकार

या घटनेनंतर तरुणी अत्यंत घाबरली होती. कोणालाही काहीही न सांगता ती फलटणच्या बसमध्ये बसली. मात्र, हडपसरपर्यंत पोहोचल्यावर तिने एका मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. त्याने तिला त्वरित पोलिसांकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर सकाळी 9:30 ते 10 दरम्यान तरुणी स्वारगेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि घटनेची माहिती दिली.

त्रयस्थ व्यक्तीला माहिती असली तरी प्रकरण दबले

घटनास्थळाजवळून जाताना तरुणीने एका व्यक्तीकडे पाहत ‘‘हा माझ्याशी वाईट वागला,’’ असे सांगितले होते. मात्र, त्या व्यक्तीने विचारपूस करण्याऐवजी ‘‘अशा प्रकारचे लोक असतात, तू घरी जा,’’ असे सांगून विषय टाळला. त्यामुळे त्याक्षणी हा प्रकार समोर आला नाही. मात्र, पोलिसांनी तपास हाती घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिस तपास सुरू; स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानकात महिलांची सुरक्षा किती प्रभावी आहे, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---