---Advertisement---

Daund : पुण्यात जन्मदात्या आईने साखर झोपेतच आवळला चिमुकल्यांचा गळा, पोटच्या गोळ्यांना का संपवलं?

---Advertisement---

Daund : पुण्याच्या दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वामी चिंचोली येथील शिंदे वस्ती येथे एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांची गळा आवळून हत्या केली आणि नंतर पतीवरही कोयत्याने हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी कोमल दुर्योधन मिढे (वय 30) या महिलेला अटक केली आहे.

पहाटेची भयाण घटना

शनिवार, 8 फेब्रुवारीच्या पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कोमलने आपल्या शंभू (वय 1) आणि पियू (वय 3) या दोन मुलांचा झोपेत असताना गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर तीने कोयत्याने पती दुर्योधन मिढे (वय 35) यांच्या मानेवर आणि

पोलिसांचा तातडीने हस्तक्षेप

घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी कोमल मिढेला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

घटनामागील कारण काय ?

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील सततचे वाद आणि सासरच्या जाचाला कंटाळून कोमलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. मात्र, पोलिस तपासानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल.

गावात शोककळा

एका आईने आपल्या पोटच्या गोळ्यांना संपवून टाकणे ही घटना गावकऱ्यांसाठी अतिशय असह्य ठरली आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, या क्रूर घटनेने सर्वांना सुन्न केलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---