Marriage : सोशल मीडियाच्या जमान्यात लग्नसमारंभ हे केवळ पारंपरिक विधी न राहता मनोरंजनाचे व्यासपीठ बनले आहेत. मित्र-मैत्रिणी लग्नात हटके रिल्स आणि डान्स करताना दिसतात. मात्र, दिल्लीतील एका लग्नात हा उत्साह नवरदेवाला चांगलाच महागात पडला.
घटनेनुसार, नवरदेव आपल्या मित्रांच्या आग्रहाखातर ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर नाचत होता. त्याचा हा डान्स पाहून वधूपिताला संताप आला आणि त्यांनी थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
सासऱ्याचा कठोर निर्णय
आतापर्यंत हुंडा, व्यसन किंवा वधूची नाराजी यामुळे लग्न मोडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, या प्रकरणात पहिल्यांदाच नवरदेवाच्या डान्समुळे लग्न रद्द झाले. वधूपित्याने हा प्रकार प्रतिष्ठेचा प्रश्न मानला आणि नवरदेवाच्या कृत्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
ही बातमी @xavierunclelite या एक्स हँडलवर शेअर करण्यात आली. पोस्टसोबत एका जाहिरातीचे कात्रणही देण्यात आले असून, त्यावर “मी अशी जाहिरात प्लेसमेंट कुठेच पाहिली नाही!” अशा खोचक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एका युजरने ही घटना एलिमिनेशन राउंड असल्याचा टोला लगावला, तर काहींनी “मित्रांमुळेच नवरदेवाची बदनामी झाली” असे म्हटले आहे.
लग्नसोहळे आणि सोशल मीडियाचे नवे ट्रेंड
आजकाल लग्नातील नाचगाणी, हटके स्टंट आणि व्हायरल होणाऱ्या रिल्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, या घटनेनंतर अशा गोष्टींची अतिरेकी क्रेझ काहींना किती महागात पडू शकते, हेही स्पष्ट झाले आहे!