ताज्या बातम्याराजकारण

Sharad Pawar : सर्वात मोठी ब्रेकींग न्युज! शरद पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात ?

Sharad Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याचे सूचक विधान केल्यानंतर, महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगलीत राजाराम बापू शिक्षण संस्थेच्या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

जयंत पाटील भाजपात जाण्याची शक्यता का?

जयंत पाटील आणि भाजप यांच्या जवळिकीची चर्चा नवी नाही. 2019 मध्येही त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चेत रंगल्या होत्या. मात्र, त्याचवेळी अजित पवारांनी बंड करत सत्तेचा तडजोडीचा फॉर्म्युला शोधला आणि जयंत पाटील राष्ट्रवादीसोबत राहिले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.

भाजप प्रवेशास कारणीभूत ठरणारी काही प्रमुख कारणे:

प्रदेशाध्यक्षपदावरून संघर्ष: रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

साखर कारखान्यांसाठी आर्थिक मदत: जयंत पाटील यांचे सहकारी आणि मतदारसंघातील कारखाने आर्थिक अडचणीत आहेत.

विधानसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य: मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सत्ता महत्त्वाची.

मंत्रिपदाची संधी: भाजपमध्ये प्रवेश केल्यास मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील भाजपमध्ये गेले तर कोणाला फायदा?

जर जयंत पाटील भाजपमध्ये गेले, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेल्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. जयंत पाटील यांचा शेतकरी वर्गावर चांगला प्रभाव आहे, त्यामुळे भाजपला ग्रामीण भागात अधिक बळ मिळेल.

सत्तेचा मोह की निष्ठा?

गडकरींच्या उपस्थितीत होणाऱ्या भूमिपूजनामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची पहिली पायरी रचली जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद स्विकारणार की राष्ट्रवादीत राहून संघर्ष करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button