---Advertisement---

Swargate : मेडीकल रिपोर्टमधून स्वारगेट प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट; दत्तात्रय गाडेने तरुणीवर एकदाच नव्हे तर…

---Advertisement---

Swargate : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात 26 फेब्रुवारीच्या पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेत आणखी गंभीर माहिती समोर आली आहे. फलटणला जाण्यासाठी बसस्थानकात थांबलेल्या 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाने पुणे तसेच संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपीने एकदा नव्हे तर दोन वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. संध्याकाळी ससून रुग्णालयाने हा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला असून, यामुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

अत्याचाराची संपूर्ण घटना

पीडित तरुणी पहाटेच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात पोहोचली होती. ती फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना आरोपी दत्तात्रय गाडे तिच्या जवळ गेला आणि तो एसटी बसचा वाहक असल्याचे भासवून तिला दिशाभूल केली. सातारची बस वेगळ्या ठिकाणी लागते, असे सांगत त्याने तिला एका बंद शिवशाही बसकडे नेले.

बसमध्ये अंधार असल्याने तरुणीला संशय आला, मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे दिवे बंद ठेवले जातात, असे सांगून आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. तरुणी बसमध्ये चढताच तोही आत आला आणि बसचे दार बंद करून तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर कोणी काही विचारले किंवा ती ओरडली तर जीव घेण्याची धमकी दिली.

आरोपी अद्याप फरार; पोलिसांचा शोध सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून, आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार आहे. बसस्थानकातील सुरक्षेच्या गंभीर उणिवा समोर आल्याने प्रशासन आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, स्वारगेट बसस्थानकात अनेक बंद बसमध्ये संशयास्पद साहित्य आढळून आल्याने हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील नागरिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---