ताज्या बातम्याकरीअरक्राईम

Infosys company : इन्फोसिस कंपनीत तुफान राडा, गेटवर बाऊन्सर्स! एकाचवेळी 400 कर्मचाऱ्यांसोबत केलं असं काही ही…

Infosys company : देशातील आघाडीच्या आयटी कंपनी इन्फोसिसने सुमारे 400 नवोदित कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये भरती करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना म्हैसूर येथील कॅम्पसमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत अपयश आल्याचे कारण देत त्यांना कामावरून कमी करण्यात आले.

कर्मचाऱ्यांचे आरोप:
इन्फोसिसने घेतलेल्या मूल्यांकन चाचण्या अत्यंत कठीण होत्या आणि त्या कर्मचारी अपयशी ठरावेत यासाठीच डिझाइन केल्या गेल्या असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. या निर्णयामुळे अनेक नवोदित कर्मचाऱ्यांमध्ये चिंता आणि असुरक्षितता पसरली आहे. काही सूत्रांच्या मते, या कर्मचाऱ्यांना कंपनी कॅम्पस त्वरित रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आणि मोबाइल फोन बाळगण्यासही निर्बंध लावण्यात आले.

इन्फोसिसचे स्पष्टीकरण:
या निर्णयावर स्पष्टीकरण देताना इन्फोसिसने सांगितले की, कंपनीच्या भरती प्रक्रियेत अंतर्गत मूल्यांकन चाचणी अनिवार्य असते. या चाचण्यांसाठी कर्मचाऱ्यांना तीन संधी दिल्या जातात आणि त्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना पुढे संधी दिली जात नाही. तसेच, कंपनीने बाउन्सर तैनात केल्याच्या वृत्ताचा इन्फोसिसने इन्कार केला आहे.

कामगार संघटनांचा विरोध:
या घटनेनंतर नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) या कामगार संघटनेने सरकारकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे त्वरित हस्तक्षेप आणि कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

ही घटना आयटी क्षेत्रातील नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण करत असून, यावर पुढील कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button