BTN International Trade : ‘या’ गोष्टी होणार स्वस्त, निर्मला सीतारामन यांचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा

BTN International Trade : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2025 संसदेत सादर केला. या आठव्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकरी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अनेक वस्तू स्वस्त करण्याबरोबरच, कररचनेतही मोठे बदल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून मोठी तरतूद, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ‘भारत ट्रेड नेट’ (BTN) डिजिटल पायाभूत सुविधा सुरू होणार, BTN आंतरराष्ट्रीय व्यापार पद्धतींनुसार विकसित होणार, व्यापारासाठी महत्त्वाचे पाऊल
हे होणार स्वस्त:
सरकारने काही महत्त्वाच्या वस्तूंवरील कर कमी करत मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वाहने, आणि वस्त्र उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. आता पुढील वस्तू स्वस्त मिळणार – मोबाईल फोन, टीव्ही आणि त्याचे पार्ट्स, भारतामध्ये तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू – बूट, बेल्ट, लेदर जॅकेट, पर्स
इलेक्ट्रिक वाहने आणि त्याचे सुटे भाग
वैद्यकीय उपकरणे आणि मरीन प्रॉडक्ट्स
महाग होणाऱ्या वस्तू:
सरकारने काही उत्पादनांवरील कस्टम ड्युटी वाढवली आहे, त्यामुळे काही वस्तू महागणार आहेत.
इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्ले – कस्टम ड्युटी 10% वरून 20%
एलईडी टीव्ही महागणार
विकसित भारतासाठी ऊर्जा मिशन
2047 पर्यंत किमान 100 GW अणुऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट,खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय
विरोधकांचा गोंधळ आणि सभात्याग
अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी गोंधळ घातला आणि काही सदस्यांनी सभात्याग केला. मात्र, अर्थमंत्र्यांनी मोठ्या घोषणा करत सर्वसामान्यांना आणि उद्योग क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातून सरकारने मध्यमवर्गीय, उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, आगामी महिन्यांत याचा प्रभाव दिसून येईल.