Chhawa : बॉक्स ऑफिसवर आलं ‘छावा’चं तुफान; 72 तासांत 10 मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड्स तोडले, फक्त एक पिक्चर पुरून उरला

Chhawa : ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमांचा पाऊस पाडला आहे. केवळ तीन दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटींच्या घरात मजल मारली असून, विक्की कौशलच्या 11 पैकी 10 चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत.
‘छावा’च्या अधिकृत आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी 33.1 कोटी, दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 49.50 कोटींची कमाई करत चित्रपटाने एकूण 121.9 कोटी रुपये कमावले. या कामगिरीमुळे विक्कीच्या ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ (245.36 कोटी) वगळता इतर सर्व चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले आहेत.
विक्की कौशलच्या चित्रपटांची लाईफटाईम कमाई (कोटींमध्ये):
- मसान: 3.65
- जुबान: 0.46
- रमन राघव 2.0: 7
- मनमर्जियां: 27.09
- भूत पार्ट वन- द हॉन्टेड शिप: 31.97
- द ग्रेट इंडियन फैमिली: 5.65
- जरा हटके जरा बचके: 88
- सॅम बहादूर: 92.98
- बॅड न्यूज: 66.28
- राजी: 123.84
‘छावा’ हा विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. त्याने विक्कीच्या 6 फ्लॉप चित्रपटांच्या एकूण कमाईपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट विक्कीच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपेक्षा सर्वात मोठी ओपनिंग फिल्म बनली आहे आणि सर्वात मोठा वीकेंड ओपनर ठरला आहे.
मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. फक्त 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट रिलीजच्या तीन दिवसांतच आपल्या बजेटचा आकडा पार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विक्की कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.