ताज्या बातम्याखेळमनोरंजन

Mohammed Shami : क्रिकेटपटू मोहम्मद शमी रोज दररोज खातो ‘या’ प्राण्याचं खातो १ किलो मांस, नाव वाचून हैराण व्हाल

Mohammed Shami : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकून टीम इंडिया २-० ने विजयी स्थितीत आहे. आज, २८ जानेवारीला तिसरा सामना होणार असून टीम इंडियाचे खेळाडू मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.

मोहम्मद शमी अजूनही अंतिम संघात नाही

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेसाठी निवडला गेला आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळालं नाही. तिसऱ्या सामन्यात शमी मैदानात उतरेल का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे.

शमीच्या फिटनेसवर टीम मॅनेजमेंट साशंक

मोहम्मद शमीने वनडे वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पायाच्या सर्जरीनंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असला तरी, टीम मॅनेजमेंट त्याला खेळवण्याबाबत सावध भूमिका घेत आहे. सर्जरीनंतर रणजी सामन्यात दमदार कामगिरी करत शमीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शमीने फिटनेसवर मेहनत घेतली असून आहारामध्ये तो प्रामुख्याने मांसाहाराचा समावेश करतो.

शमीचा आहार आणि तयारी

शमीच्या आहाराबद्दल बोलताना त्याचा मित्र उमेश कुमारने सांगितलं की, शमी रोज एक किलो मटन खातो. मांसाहाराशिवाय त्याला ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे त्याचा बॉलिंग स्पीडही कमी होतो, असं उमेशने नमूद केलं.

शमी खेळणार की नाही?

फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सांगितलं की, शमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मात्र, त्याच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर घेतील. शिवाय, रिंकू सिंह आणि नितीशकुमार रेड्डी अनुपस्थित असल्याने शिवम दुबेला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुबेने डावाच्या मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यामुळे त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.

आजच्या सामन्यात टीम इंडिया मालिका विजयी करणार का, आणि मोहम्मद शमीला मैदानात पाहायला मिळणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Related Articles

Back to top button