---Advertisement---

Suresh Dhas : खोक्याने तस्करी केलेल्या हरणांचे मटण सुरेश धस यांच्याकडे जाते, मुंडेंचा गंभीर आरोप

---Advertisement---

Suresh Dhas : शिरूर तालुक्यातील *हरिण तस्करी प्रकरणावरून मोठा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर *तस्करीच्या हरणांचे मटण स्वीकारल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गावकऱ्यांसह ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ लवकरच भेटणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोठ्या आंदोलनाची तयारी
या मुद्द्यावर रविवारी शिरूरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. टीपी मुंडे यांच्या मते, सतीश उर्फ खोक्या भोसले याने मारलेल्या हरणांचे मटण सुरेश धस यांना पोहोचवलं जातं, त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नाही. “जर आमदार धस स्वतः हरणाच्या मटणाचा लाभ घेत असतील, तर भोसलेवर गुन्हा दाखल होणार तरी कसा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांची भेट आणि कारवाईची मागणी
मुंडे यांनी याप्रकरणी *वनमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या मते, *सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे, कारण ते वन्यजीव तस्करीशी संबंधित व्यक्तींना पाठीशी घालत आहेत. “हे स्वतःला इतरांना ‘आका’ म्हणतात, पण हेच तर ‘आकांचे आका’ आहेत,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

वन्यजीव तस्करीचा गंभीर मुद्दा
हरीण, डुक्कर आणि अन्य *वन्य प्राण्यांच्या तस्करीवर बंदी असतानाही अशा घटना घडत आहेत, याकडे टीपी मुंडे यांनी लक्ष वेधलं. त्यांनी *सर्वप्रथम सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शिरूरमध्ये वाढता संघर्ष
या प्रकरणामुळे शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असून, रविवारी होणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आता मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---