Govinda : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सध्या जोरात आहे. १९८७ मध्ये विवाहबंधनात अडकलेली ही जोडी चाहत्यांची लाडकी मानली जाते. मात्र, आता त्यांच्यातील नाते दुरावत असल्याचे बोलले जात आहे. गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चांमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या शक्यता वर्तवली जात आहेत.
गोविंदाची पहिली प्रतिक्रिया
या चर्चांदरम्यान, गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. ईटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, सुनीताने काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याची नोटीस पाठवली होती. मात्र, त्यानंतर काही ठोस हालचाल झालेली नाही.
गोविंदाला याबाबत विचारले असता तो म्हणाला, “सध्या फक्त बिझनेसवर चर्चा सुरू आहे. मी माझा चित्रपट सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.” मात्र, सुनीताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कुटुंबातील वादामुळे वाढले मतभेद?
गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, “कुटुंबातील काही सदस्यांनी केलेल्या विधानांमुळेच गोविंदा आणि सुनीता यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. यापेक्षा जास्त काही नाही. आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.”
याआधी एका मुलाखतीत सुनीताने स्पष्ट केले होते की ती आणि गोविंदा सध्या वेगळे राहत आहेत. सुनीता आपल्या मुलांसह फ्लॅटमध्ये राहते, तर गोविंदा त्याच फ्लॅटसमोरच्या बंगल्यात वास्तव्यास आहे.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
या चर्चांना आणखी वाढ देणारी एक पोस्ट रेडिटवर व्हायरल झाली होती. त्यामध्ये दावा करण्यात आला की, गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत आणि गोविंदाचे एका तरुण मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू आहे.
तथापि, या सर्व चर्चांमध्ये अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील पुढील घडामोडींकडे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत.