Kanpur : प्रेमाला वयाची सीमा नसते, याची प्रचिती देणारी घटना उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. 50 ते 55 वर्षीय महिलेने 30 वर्षीय तरुणासोबत घर सोडल्याने संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे. कुटुंबाला हा धक्का बसल्याने त्यांनी बदनामीच्या भीतीने पोलिसांकडे तक्रार करण्याचे टाळले.
चार महिन्यांपासून कुटुंब गुपचूप; समाजाच्या दबावामुळे तक्रारीस नकार ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली असली तरी कुटुंबाने समाजात अपमान होऊ नये म्हणून कुठेही तक्रार केली नाही, असे संबंधित महिलेच्या मुलाने सांगितले. कुटुंबाला या प्रकरणामुळे समाजात तोंड लपवावे लागत असल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही.
प्रकरण कानपूरमध्ये चर्चेत; पोलिसांनी दिले वक्तव्य
ही घटना कानपूरच्या बजारिया भागात घडली असून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अधिकृत तक्रार आल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणावर कोणतीही अधिकृत नोंद नाही.