Preity Zinta : ‘पंतप्रधानांचं कौतुक केलं की तुम्ही भक्त, हिंदू धर्माचा अभिमान असेल तर तुम्ही अंधभक्त..’ प्रीती झिंटाच्या पोस्टवरून वाद
Preity Zinta : /बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. एक्स (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर तिने समाजमाध्यमांवरील ट्रोलिंगवर जोरदार टीका केली आहे. “जर तुम्ही पंतप्रधानांची स्तुती केली, तर तुम्हाला भक्त म्हणतात आणि जर तुम्ही हिंदू धर्माचा अभिमान बाळगला, तर तुम्हाला अंधभक्त ठरवलं जातं,” अशी खंत तिने व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर प्रीतीची नाराजी
अलीकडेच, प्रीती झिंटाने एका एआय चॅटबॉटशी संवाद साधला होता आणि त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, यावरही लोकांनी तिला ट्रोल केल्याने तिने सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेबद्दल भाष्य केलं. प्रीतीने लिहिलं, “सोशल मीडियावर लोकांना काय होतंय? प्रत्येक जण टीकाकार झाला आहे. जर कोणी एआय बॉटशी संवाद साधण्याचा अनुभव सांगत असेल, तर लगेचच त्याला जाहिरात म्हणून हिणवलं जातं.”
जीनशी लग्न का केलं? प्रीतीचा मजेशीर खुलासा
प्रीती झिंटाने ट्रोलिंगविरोधात आपली भूमिका स्पष्ट करताना लोकांना शांत राहण्याचा सल्लाही दिला. ती म्हणाली, “लोकांनी दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसणं बंद करायला हवं. आपण संवाद साधल्यास सर्वांना आनंद मिळेल.”
तिच्या खासगी आयुष्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत ती पुढे म्हणाली, “आता मला विचारू नका की मी जीनशी लग्न का केलं? मी त्याच्यावर प्रेम करते, म्हणून केलं! 💕 कारण ‘सरहद पर एक ऐसा शक है, जो मेरे लिए अपनी जान दे सकता है’ 🤩❤️ समझे? 😂 टिंग!”
प्रीती झिंटाच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे, तर अनेक चाहत्यांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे.