Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात एक मोठी कारवाई झाली असून, मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद अलियानला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी विविध विभागांमध्ये सुमारे ३० पथके तयार केली होती. मोहम्मद अलियानचे असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपीला हिरानंदानी परिसरातून अटक
रविवारी रात्री उशिरा हिरानंदानी परिसरातून आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडताच त्याने मी विजयदास असल्याचे सांगीतले. परंतू पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने त्या खरे नाव मोहम्मद अलियान असल्याचे सांगीतले. तसेच त्याने सैफवरील हल्ल्याची कबुलीही दिली.
मुंबई पोलिसांनी ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडपातून आरोपीला पकडण्यात आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने सैफच्या(Saif Ali Khan) घरात चोरीसाठी प्रवेश केला होता. सैफ अली खानने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात गोंधळ झाला. या गोंधळात सैफ गंभीररित्या जखमी झाला होता.
मोहम्मद अलियानचा मागील इतिहास
संशयित मोहम्मद अलियान उर्फ विजय दास याने मुंबईतील एका पबमध्ये काम केले होते. त्यानंतर त्याने ठाण्यातील रिकी बारमध्येही काम केले होते. १६ जानेवारी रोजी सैफ अली खानच्या(Saif Ali Khan) घरात चोरीच्या उद्देशाने तो घुसला होता. सैफने(Saif Ali Khan) त्याला पाहिल्यावर गोंधळ झाला आणि हल्ल्याचा प्रकार घडला.
पोलिसांनी मोठ्या यशाने पकडलेला आरोपी
पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी छापे टाकले. ठाण्यातील हिरानंदानी परिसरात असलेल्या कामगार छावणीत मोहम्मद अलियान सापडला आणि त्याला अटक करण्यात आली. ठाणे (पश्चिम) येथील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीतून ठाणे पोलीस झोन ६ चे डीसीपी नवनाथ ढवळे आणि कासारवडवली पोलिसांच्या पथकाने मोहम्मद उर्फ विजय दासला अटक केली. रविवार, १९ जानेवारी रोजी सकाळी पोलीस आरोपीला रिमांडसाठी न्यायालयात हजर करणार आहेत.
सैफच्या कुटुंबाला दिलेला धक्का
हल्ला घडताना सैफ अली खान जहांगीरच्या खोलीच्या दिशेने गेला होता, कारण त्याला वाटले की आरोपी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. घरातील कर्मचाऱ्यांनी गोंधळ झाल्याचे लक्षात येताच मदत मागवली, परंतु या हल्ल्यात सैफ जखमी झाला. या प्रकरणात आता आरोपीला अटक झाल्यामुळे पुढील तपास वेगाने सुरू आहे.