Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर एकामागोमाग एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
मुलीच्या जबाबात हृदय पिळवटून टाकणारा खुलासा
देशमुख यांची मुलगी वैभवी हिने दिलेल्या जबाबात हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. “आपल्याला काही झाल्यास आई आणि विराजची काळजी घे,” असा भावनिक सल्ला देशमुख यांनी आपल्या लेकीला दिला होता. मात्र, त्यांच्या विनवणीनंतरही आरोपींनी कोणतीही दया दाखवली नाही आणि निर्दयीपणे मारहाण सुरूच ठेवली, असे वैभवीने स्पष्ट केले.
गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरणार महत्त्वाचे
या प्रकरणाच्या चौकशीत पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरत आहेत. तसेच, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या टोळीची दहशत किती भयंकर होती, हेही चौकशीत स्पष्ट झाले आहे.
हत्येचा कट कसा रचला गेला?
तपासातून हत्येचा कट नेमका कसा, कुठे आणि कधी रचला गेला? याची सविस्तर माहिती समोर आली आहे. कराड, चाटे आणि घुले टोळीच्या दहशतीबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून, गुन्ह्यातील संपूर्ण चित्र आता स्पष्ट होत आहे.
तपास यंत्रणांसाठी जबाब महत्त्वाचे
या जबाबांमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार असून, आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. हत्येचा कट रचणाऱ्या टोळीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.