---Advertisement---

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; एक-एक शब्द वाचून अक्षरश डोळ्यात पाणी येईल

---Advertisement---

Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असला तरी, अजूनही एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता आरोपपत्र दाखल केले असून, वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून नामांकित करण्यात आले आहे. राज्यभर या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.

सीआयडीच्या हाती ठोस पुरावे

संतोष देशमुख यांच्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचे पुरावे सीआयडीच्या तपासात उघड झाले आहेत. आरोपींनी देशमुखांना बेदम मारहाण केली, याचे फोटो आणि व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी तपासादरम्यान एकूण पाच मोबाईल हस्तगत केले असून, त्यापैकी महेश केदारच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि जखमी अवस्थेतील फोटो आढळून आले.

PM अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन (PM) अहवालातून त्यांच्या हत्येची भीषणता समोर आली आहे. अहवालानुसार, त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळल्या.

  • हनुवटी, कपाळ आणि दोन्ही गालांवर जखमांचे व्रण
  • छाती, गळा आणि पोटावर बेदम मारहाणीचे स्पष्ट निशाण
  • नाकातून रक्तस्राव, दोन्ही बरगड्यांवर आणि डाव्या खांद्यावर गंभीर जखमा
  • कोपर, मनगट आणि हाताच्या मुठींवर खोल जखमा
  • अमानुष मारहाणीमुळे संपूर्ण पाठ काळ्या-निळ्या जखमांनी भरलेली

विशेष म्हणजे, हल्ल्यात वापरलेल्या लोखंडी पाईपचे तब्बल १५ तुकडे झाले होते, यावरून हल्ल्याची तीव्रता लक्षात येते.

क्रौर्याचा कळस: आरोपींचे कृत्य निर्घृण

या घटनेतील आरोपींनी केवळ मारहाण करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी देशमुख यांचे कपडे काढून त्यांचे फोटो काढले आणि ‘मोकारपंती’ नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडीओ कॉलही केला. मृत्यूपूर्वी देशमुख यांनी “माझे हात-पाय तोडा पण मला सोडून द्या,” अशी विनवणी केली होती, मात्र निर्दयी आरोपींनी त्यांना तडपवून संपवले.

या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि त्यांना फाशीच द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---