Shirish Maharaj : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्यांमधून त्यांनी आपले टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारणे स्पष्ट केली. त्यांनी आर्थिक विवंचनेचा उल्लेख केला असला तरी, कोणाचेही कर्ज बुडू नये याची काळजी घेत, आपल्या कुटुंबीयांना ते फेडण्याचे आवाहन केले.
मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार बंद असल्याने संशय आला. दार तोडून पाहिले असता, त्यांनी उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. या दुर्दैवी घटनेनंतर समाजात आणि सोशल मीडियावर आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, मोरे कुटुंबीयांनी या चर्चाना दुःखद व वेदनादायी म्हणत त्यांना चुकीच्या पद्धतीने मांडले जात असल्याचे स्पष्ट केले.
संस्कार आणि परंपरेची जपणूक
शिरीष महाराज यांनी किर्तनसेवेला वाहून घेतले होते. अनेकजण किर्तनावर मोठे होत असताना त्यांनी नेहमी मोफत सेवा दिली. त्यांच्या निःस्वार्थी कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्यावर प्रेम केले. त्यांच्या आत्महत्येने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना अनेक भक्त आणि अनुयायी व्यक्त करत आहेत. “शिरीष महाराजांनी मदतीसाठी आवाज दिला असता, तर संपूर्ण महाराष्ट्र धावून आला असता,” असे देहूतील नागरिकांचे म्हणणे आहे.
धर्मासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व
शिरीष महाराज मोरे हे श्री शंभू विचार मंचच्या माध्यमातून सक्रिय होते. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी मोठे कार्य केले. विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला होता. संभाजी महाराजांच्या इतिहासाचे प्रबोधन करणे हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश होता.
धर्मासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व
शिरीष महाराज मोरे हे श्री शंभू विचार मंचच्या माध्यमातून सक्रिय होते. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी मोठे कार्य केले. विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला होता. संभाजी महाराजांच्या इतिहासाचे प्रबोधन करणे हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश होता.
देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी शिरीष महाराजांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना सांगितले, “आमचा उगवता तारा निखळला आहे. त्यांचे जाणे आम्हाला मोठी हानी आहे.”
दरम्यान, देहूरोड पोलिसांनी शिरीष महाराज यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत पुढील तपास सुरू केला आहे.