---Advertisement---

Supriya Sule : ‘अमित शहांनी शब्द दिलाय की…’; संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठे वक्तव्य

---Advertisement---

Supriya Sule : पुण्यातील युवकाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय केली जाणार नाही, असे सुळे यांनी ठामपणे सांगितले.

“मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी पदर टाकणार”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी महाराष्ट्रातील खासदार म्हणून नाही, तर एका महिलेसारखी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. माझा पदर पुढे करणार, कारण आमच्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे.” त्या पुढे म्हणाल्या, “अन्नत्याग करू नका, आपण सर्व मिळून लढूया. आम्ही लोकशाही मार्गाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.”

“माणुसकीच्या नात्याने हा लढा मी लढणार”

सुळे यांनी सांगितले की, “कुठल्याही आईसाठी तिच्या मुलाचे जाणे हे सर्वात मोठे दु:ख असते. 69 दिवस झाले, तरी पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नाही, हे धक्कादायक आहे. राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने मी हा लढा लढणार आहे. पक्ष, राजकीय मतभेद यापेक्षा माणुसकी मोठी आहे.”

“महाराष्ट्रात माणुसकी हरवली आहे का?”

सुळे यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले, “मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा होत्या. देशमुख कुटुंबीयांनी त्यांना भेटल्यानंतर आठ दिवसांत न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, राजकारण सुरूच राहिले, पण सरकारने कठोर भूमिका घेतली नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “आज मला प्रश्न पडतोय, महाराष्ट्रात माणुसकी हरवली आहे का?”

“सत्ता आणि पैशांची मस्ती उतरली पाहिजे”

सुप्रिया सुळे यांनी कठोर शब्दांत सांगितले, “जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सत्याचा विजय झाला पाहिजे. ही सगळी सत्ता आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे!”

सुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता मुख्यमंत्री आणि प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---