ताज्या बातम्याक्राईम

Swargate : तहानने व्याकूळ नराधम गाडे पाणी मागायला नातेवाईकांकडे गेला, रडत म्हणाला, मला पश्चाताप होतोय…

Swargate : पुणे पोलिसांना गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत असलेला स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर गजाआड करण्यात यश आले. गुन्हा घडल्यानंतर तो आपल्या गावी पळून गेला होता.

मात्र, माध्यमांतून त्याचे फोटो आणि बातम्या झळकू लागल्यानंतर त्याने गावही सोडले. दोन दिवस तो उपाशी राहिल्यामुळे भुकेने व्याकुळ झाला होता. पाण्यासाठी नातेवाईकांकडे गेल्यानंतर, त्याने आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी तातडीने हालचाल करत त्याला अटक केली.

पाणी नाकारल्याने गाव सोडावा लागला

गावातील एका वृद्ध महिलेकडे बुधवारी रात्री पिण्यासाठी पाणी मागण्यास तो गेला होता. मात्र, महिलेला त्याची ओळख पटली. “तू टीव्हीवर दिसत आहेस, तुला मी पाणी देणार नाही,” असे सांगत तिने पाणी देण्यास नकार दिला. यानंतर तो घाबरून तिथून पळून गेला, असे वृद्धेने पोलिसांना सांगितले.

गावकऱ्यांचा मोठा सहभाग

गावकऱ्यांनी आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. “गावात त्याचा स्वभाव चांगला होता, पण त्याने जे कृत्य केले आहे, ते अक्षम्य आहे,” असे गावकरी म्हणाले.

कॅनॉलजवळ सापळा रचून अटक

गेल्या ७० तासांपासून पोलिसांचा शोध सुरू होता. अखेर, तो एका कॅनॉलजवळ झोपलेला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात लपला होता आणि उपाशी होता. शेवटी, भुकेने व्याकूळ होऊन पाण्यासाठी नातेवाईकांकडे गेला आणि त्याच दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Related Articles

Back to top button