Dutta Gade : दत्ता गाडेबाबत भयानक अपडेट समोर, एकट्या महिलांना करायचा टार्गेट, भाजी विक्रेत्या महिलेला शरीरसुखासाठी…

Dutta Gade : स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा दत्तात्रय गाडे (वय ३६) याच्या गुन्हेगारी इतिहासाचा पोलिस तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. गाडे हा प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांना हेरून त्यांच्यावर अत्याचार व लुटमारीसारखी गंभीर गुन्हेगारी कृत्ये करीत होता.
एकट्या महिलांना लक्ष्य करून लुटमार
दत्तात्रय गाडेविरोधात पुणे ग्रामीणमधील शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर (सुपा व कोतवाली) पोलिस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल आहेत. यातील सर्व तक्रारी महिलांनी दिल्या असून, त्यापैकी एक प्रकरण विनयभंगाचे आहे. त्यामुळे गाडेचा महिलांविषयीचा दृष्टिकोन विकृत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
गाडेने महिलांना फसवून निर्जनस्थळी नेऊन लुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. २०१९ आणि २०२० मध्ये त्याच्याविरोधात शिक्रापूर, शिरूर, सुपा आणि कोतवाली पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत.
गुन्ह्यांची पद्धत – विश्वास संपादन करून लूट
- पुण्याला जाण्यासाठी बसस्थानकात प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना गाडे स्वतःच्या चारचाकीतून सोडण्याचे आमिष दाखवायचा.
- निर्जनस्थळी पोहोचल्यावर गळा दाबून दागिने व इतर मौल्यवान वस्तू हिसकावायचा.
- काही प्रकरणांमध्ये चाक पंक्चर झाल्याचे सांगून महिलांना अडवून धमकावत लुटमार केली.
- एका घटनेत भाजीविक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर गाडी थांबवून त्याने शरीरसुखाची मागणी केली होती. महिलेला संताप आल्याने तिने गाडीवर दगड मारल्यावर तो पळून गेला.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे, कठोर कारवाईची मागणी
गाडेच्या विरोधातील वाढत्या तक्रारींमुळे पोलिसांनी त्याच्यावर अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. महिलांना लक्ष्य करून गुन्हे करणाऱ्या या आरोपीला तातडीने कठोर शिक्षेची आवश्यकता आहे, असे नागरिक व महिला संघटनांकडून म्हटले जात आहे.