ताज्या बातम्या

Santosh Deshmukh : ‘तो’ एक पुरावा ठरणार गेमचेंजर, ज्याने उलगडणार संतोष देशमुखांच्या हत्येचं गूढ, धनंजय देशमुखांनी केली मोठी मागणी

Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दोन महिने उलटले असतानाही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांना त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. दुसरीकडे, या हत्येप्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींवर मकोका लागू करण्यात आला असला तरी अद्याप कोणतीही ठोस शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.

या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून ओळखला जाणारा विष्णू चाटे याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आरोपींची पुन्हा रिमांड घेण्याची मागणी केली आहे.

धनंजय देशमुख यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, जर या मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले, तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन स्वीकारणार आहे का? त्यामुळे सर्व आरोपींची पुन्हा चौकशी करून मोबाईल शोधण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

ही हत्या ९ डिसेंबर रोजी अपहरणानंतर क्रूर पद्धतीने करण्यात आली होती. या प्रकरणात आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला आहे. कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली असली, तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर असून, ते या प्रकरणावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button