Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, आणि त्याचा फटका आता त्यांच्या मुलांनाही बसत आहे. विनोद सध्या कोणतेही काम करत नसल्याने त्याला आर्थिक स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे.
बीसीसीआयकडून मिळणाऱ्या फक्त ३० हजार रुपयांच्या पेन्शनवर त्याचे घर चालते. मात्र, त्याच्या कर्जबाजारीपणामुळे आणि कमाई नसल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. विनोद कांबळी आणि त्यांच्या पत्नी अँड्रिया यांना दोन मुलं आहेत.
मुलगा जीजस ख्रिस्तियानो (१४ वर्षे) हा वडिलांसारखा डावखुरा फलंदाज आहे, तर मुलगी जोहाना ख्रिस्तियाना (१० वर्षे) शाळेत शिक्षण घेत होती. मात्र, विनोदकडे मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांना शाळेतून काढण्यात आले आहे.
यामुळे विनोदने मदतीसाठी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्याकडे विनंती केली आहे. गावस्कर यांनी त्याला मदत करण्याचे संकेत दिले आहेत. जर त्यांना ही मदत मिळाली, तर त्यांच्या मुलांचे शिक्षण पुन्हा सुरू होऊ शकते.
विनोदची परिस्थिती अधिक बिकट होण्याचे एक कारण म्हणजे ८ कोटींच्या घरासाठी घेतलेले कर्ज, जे अद्याप फेडले गेलेले नाही. शिवाय, त्याचे घरभाडेही थकले आहे, ज्यामुळे त्याच्या घरावर नोटीस लावण्यात आली आहे. काही काळापूर्वी विनोदने सचिन तेंडुलकरसोबत कोचिंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रकृती बिघडल्यामुळे तोही प्रयत्न अयशस्वी झाला.
त्याच्या परिस्थितीवर मदतीचा हात पुढे करण्यासाठी सुनील गावस्करची भूमिका महत्वाची ठरणार आहे.