ताज्या बातम्या

Vinod Kambli : कांबळीची बायको अँड्रियाचं होतंय सगळीकडून कौतुक, वानखेडेवर घडलं असं काही की..पाहा व्हिडिओ

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी काही दिवसांपूर्वी चर्चेत होता, मात्र आता त्याची पत्नी अँड्रिया चर्चेचा विषय बनली आहे. अँड्रियाचे जगभरातून कौतुक होत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत अँड्रियाने सर्वांची मने जिंकली आहेत.

वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमासाठी विनोद कांबळीला आमंत्रित करण्यात आले होते. विनोद आपल्या पत्नी आणि मुलांसह या कार्यक्रमाला हजर राहिला. त्याची सुटा-बुटात, गॉगलसह केलेली स्टायलिश एंट्री उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली. कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती आणि विनोदला भेटण्यासाठी चाहते आणि माजी क्रिकेटपटू जमले होते.

या संपूर्ण काळात अँड्रिया विनोदसोबत सावलीसारखी होती. गर्दीतून मार्ग काढताना आणि कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर ती त्याच्याबरोबर होती. विनोदची प्रकृती अजून पूर्णपणे ठीक नसल्यामुळे, त्याला चालण्यात त्रास होत होता. या स्थितीत अँड्रियाने त्याचा हात घट्ट धरून ठेवला, ज्यामुळे तिच्या समर्पणाचे आणि आधाराचे कौतुक होत आहे.

सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, रवी शास्त्री यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, कार्यक्रमात भाव खाऊन गेला तो विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नी अँड्रियाचे नातेच.

Related Articles

Back to top button