Virender Sehwag : माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर पकडला आहे. तब्बल २० वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या नात्यात बिनसण्यामागे कोणते कारण असावे, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत.
वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचे प्रेमविवाह होते. वीरेंद्रला केवळ सात वर्षांचा असतानाच आरती पहिल्यांदा एका लग्नसमारंभात दिसली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि तब्बल १४ वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, घरच्यांचा विरोध असल्याने त्यांना पळून जाऊन विवाह करावा लागला होता.
सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे नाव घेतले जात आहे. सेहवागने एका कार्यक्रमात आपली भावना व्यक्त करताना सांगितले होते की, “मी बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीवर फिदा आहे. ती उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच, पण तितकीच अप्रतिम नर्तिकाही आहे. मला एकदा तिच्यासोबत काम करायला मिळाले तर खूप आनंद होईल.” या अभिनेत्रीचे नाव विचारले असता त्याने माधुरी दीक्षितचे नाव घेतले होते.
सेहवाग क्रिकेटच्या मैदानावर असतानाही गाणी गुणगुणायचा, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, माधुरी दीक्षितचा अभिनय आणि तिचे नृत्य त्याला विशेष आवडते, असे त्याने अनेकदा सांगितले आहे. मात्र, त्याच्या या आवडीचा आणि त्याच्या वैवाहिक आयुष्यातील तणावाचा काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.