Nagpur news : दारू प्यायला पैसे दे म्हणत नवऱ्याचा बायकोकडे पैशांसाठी तगादा, संतापलेल्या पत्नीने एकदाचा विषयच मिटवला

Nagpur news : दारूमुळे अनेकांच्या घरात किती भयंकर घटना घडत आल्या आहेत, हे वेगळं सांगायला नको. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारू प्यायला पैशांचा तगादा लावणाऱ्या पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे.

यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आनंद भय्यूजी पाटील असे मृतकाचे नाव आहे. तसेच अरुणा पाटील असे पत्नीचे नाव आहे. महिलेने 15 तासांपेक्षा अधिक काळ मृतदेहासोबत काढल्यानंतर स्वतः पोलिसांना जाऊन माहिती दिली. यामुळे सगळेच हादरले आहेत. कामठी तालुक्याच्या आवंढी गावात ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, पतीने दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने पत्नीने त्रास देणाऱ्या पतीच्या डोक्यात झोपेतच दगड घातला. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. घटनेनंतर तब्बल 15 तास उलटल्यावर स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना माहिती दिली.

मृत आनंद पाटील हा घर बांधकामावर मजूर म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. यामुळे रोज घरात वाद निर्माण होत होता. रात्री मृतक आनंदन पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने दोघात झालेला वाद हा विकोपाला गेला. यामुळे पत्नीला खूप राग आला.

डोक्यात असलेल्या रागामुळे त्याच्या डोक्यात दगड घातला. पोलिसांनी पत्नी अरुणा पाटीलच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. दोघांना मयूर नावाचा एकुलता एक मुलगा आहे. दारूच्या व्यसनाने पुन्हा एक कुटुंब उध्वस्त झाल्यानं सर्वत्र हळहळ केली जात आहे.

दरम्यान, त्यांचा मुलगा घटनेदिवशी याठिकाणी नव्हता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत. पोलिसांनी घटनेची शहानिशा करण्यासाठी पंचनामा केला आहे.