पतीने गळफास तर पत्नीने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या, चिमुकले अनाथ, भयंकर कारण आले समोर…

एका दांम्पत्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कंधार तालुक्यातील इमामवाडी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. रामदास सोपान करेवाड ( वय ३५) आणि वर्षा रामदास करेवाड ( वय ३०) असे दांम्पत्याच नाव आहे.

या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोघे इमामवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन लहान आपत्य आहेत. आता ते दोघे पोरखे झाले आहेत. यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांचे मन हेलावून गेले आहे.

याबाबत माहिती अशी की, काही दिवसापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद होत होते. अनेकदा हा वाद पाहुण्यांनी मिटवला होता. त्यांची समजूत देखील काढण्यात आली होती. मात्र त्यांच्यात वाद होतच होते. सकाळी दोघांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद झाला.

हा वाद मिटलाच नाही. त्यांना कठोर निर्णय घ्यावा लागला आणि काही वेळातच होत्याच नव्हते झाले. त्यांनी त्यांचे आयुष्य संपवल. रामदास करेवाड यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे उपस्थित सगळेच हादरले.

यानंतर पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नी वर्षा हिने देखील जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे त्यांची लहान दोन मुले आई वडिलांविना पोरकी झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच याठिकाणी पोलीस आले.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार शिवाजी सानप, बापूराव व्यवहारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला. मृतकांना ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. कंधार पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.