मी ब्रेकअप केलं!! सुहाना खानच्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का, पोस्ट नेमकी कोणासाठी?

लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान हिने अभिनय क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नशीब आजमावत आहे. ती सतत चर्चेत देखील असते. आता देखील ती चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

तिने मी ब्रेकअप केले आहे, असं म्हटलं आहे. सुहानाचे नाव अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चनचा लेक अगस्त्य नंदाबरोबर जोडले होते. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याबाबत चर्चा होत आहे. सुहाना आणि अगस्त्य यांना एकत्र स्पॉटही करण्यात आले होते. यामुळे आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा या पोस्टमुळे सुरू आहेत.

असे असताना सुहानाने ही पोस्ट तिच्या डेटिंग लाइफबद्दल केलेली नाही. सुहानाने या पोस्टमधून एका साबणाची जाहिरात केली आहे. एका प्रसिद्ध साबणाच्या जाहिरातीत सुहाना झळकली आहे. यामुळे सुरुवातीला चाहत्यांना एक वेगळंच काहीतरी वाटलं. मात्र नंतर सर्वांला हा प्रकार समजला.

पोस्टमध्ये ती म्हणाली, माझ्याकडे एक बातमी आहे. मी ब्रेकअप केलं आहे. माझ्या साबणाबरोबर, असे म्हणत तिने अनेकांना कोड्यात टाकलं आहे. तिच्या या पोस्टवर श्वेता बच्चनेही कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. आता सुहाना ‘किंग’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यामध्ये सुजॉय घोष याचं दिग्दर्शन करत आहे. लंडनमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना याबाबत उत्सुकता लागली असून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.