तुला आमदार मी केलय, माझ्या वाटेला गेला तर मी सोडणार नाही, पुन्हा जर..; शरद पवारांची अजितदादा गटातील आमदाराला जाहीर धमकी

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी भरसभेत इशारा दिला आहे. तू आमदार कुणामुळे झाला, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही असा इशारा शरद पवार यांनी सुनील शेळके यांना दिला आहे. याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तसेच ते म्हणाले, लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात असेही शरद पवार म्हणाले. यामुळे आता मावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी शरद पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. तुमच्या फॉर्मवर माझी सही आहे.

माझ्या सहीने तुम्ही निवडूण आलात आणि आज तुम्ही त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांना तुम्ही दमदाटी करता. असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या गटाचे आमदार सुनील शेळके यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, माझी विनंती आहे एकदा दमदाटी केलीत बस्स. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला.

मी या रस्त्याने कधी जात नाही. पण त्या रस्त्याने जाण्याची स्थिती तुम्ही निर्माण केली तर सोडतही नाही. असा इशारा देखील त्यांनी भर सभेत दिला आहे. यावर सुनील शेळके यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर अजित पवार यांचे आमदार शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. असे असले तरी अजूनही शरद पवार यांच्यासोबत लोकं असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या निवडणूक याबाबत अनेक गोष्टी पुढे येतील.