मी प्रेग्नन्सीमध्ये बिअर प्यायचे, मला बिअरचे डोहाळे लागले होते!! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव

सिनेसृष्टीत अभिनेत्रींच्या वेगवेगळ्या कारणाने त्या सतत चर्चेत असतात. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर ही देखील एका वक्तव्याने चर्चेत आली आहे. अदिती ही विविध युट्यूब चॅनल्सला मुलाखती देखील देते. यामध्ये तिने केलेले एक विधान चर्चेचा विषय बनले आहे.

मुलाखतींमध्ये अदितीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अदितीने तिला प्रेग्नन्सीदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. यामुळे यांची बरीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. ती म्हणाली, मला बिअरचे डोहाळे लागले होते. मी प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला खूप एक्सायटेड असायचे.

याबाबत तिने सांगितले की, मला प्रेग्नन्सीमध्ये बिअरचे डोहाळे लागले होते. मग मी बिअर प्यायचेय. मी प्रेग्नन्सीदरम्यान इंडियन फूड खाल्ल नाही. तसेच याबाबत त्या काळात कोणते अन्न खाल्ले ते देखील सांगितले आहे. यामुळे तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

तेव्हा मी फक्त सॅलड खात होते आणि बिअर प्यायचे. मी डॉक्टरांना सांगितलं की, बिअर प्यायले नाही तर मला कसं तरी होतं, चिडचिड होते. मग डॉक्टर मला म्हणाले की, एक-दोन सीप बिअर प्या. मग मी 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये बिअर प्यायचे. असा मोठा खुलासा त्यांनी केला.

तसेच ती म्हणाली, बऱ्याच जणांना Postpartum depression बद्दल माहित नसतं. बाळ झाल्यानंतर बाई कधीही रडते, तिला मूड स्विंग्स होत असतात. लोकांना वाटतं की, हे नॉर्मल आहे. बाळंतीण झालेल्या बाईची काळजी घ्या. ती बाई आनंदी राहिली तर ती बाळाची काळजी घेईलच.

अदितीच्या कामाचे देखील नेहेमी कौतुक होत असते. अदितीचा बाई गं हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अदितीसोबतच स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहरे हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.