पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, इस्लाम स्विकार अन्यथा…; तरुणीसोबत घडलं भयंकर

कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका विवाहित महिलेवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपासात भयंकर माहिती समोर आली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका दांपत्याचाही समावेश आहे. महिलेचे आक्षेपार्ह फोटो वापरुन तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेने तक्रारीत आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे सांगितले आहे. आरोपीने पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला. तसंच भांगेत कुंकू लावण्याऐवजी डोक्यावर बुरखा घेण्यास सांगितले.

पोलीस याबाबत तपास करत असून आरोपीचे नाव रफीक आहे. त्याने आणि त्याच्या पत्नीने महिलेची दिशाभूल करत तिला लैंगिक गोष्टींमध्ये सहभागी करुन घेतल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत जातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, त्यांनी तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. तसेच फोटोंच्या माध्यमातून त्यांनी तिला ब्लॅकमेल केलं आणि हिंदू धर्म सोडून इस्लाम स्विकारण्यास जबरदस्ती केली. यामुळे हिंदू संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. रफीक आणि त्याच्या पत्नीने महिलेला आपलं घर सोडून बेळगावमधील आपल्या घरी येऊन राहण्यास भाग पाडले होते.

दरम्यान, तिघेही एकाच घरात राहत होते. रफीकने गतवर्षी आपल्या पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला. तसेच बुरखा घालण्यास आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यास भाग पाडले. रफिकने महिलेला तिच्या पतीला घटस्फोट देण्यास सांगितलं आणि जर तिने त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तिचे आक्षेपार्ह फोटो लीक करण्याची धमकी दिली.