ICC ने जाहीर केली वर्ल्डकपची प्लेइंग इलेव्हन! भारताच्या ‘या’ 6 खेळाडूंचा समावेश, विश्वविजेत्या कमिन्सला वगळले…

विश्वचषक 2023 फायनल नंतर ICC ने आपल्या प्लेइंग-11 मध्ये 6 भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आयसीसीने निवडलेल्या प्लेइंग-11 मध्ये एकूण 6 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या ICC ODI World Cup 2023 मधील भारतीय संघाची कामगिरी अतुलनीय होती. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीचे तिकीट बुक केले होते.

ऑस्ट्रेलियन संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या ट्रॉफी जिंकण्याच्या आशा धुळीस मिळवल्या.

दरम्यान, अंतिम सामन्यानंतर, ICC ने विश्वचषक 2023 मधील सर्वोत्कृष्ट प्लेइंग-11 घोषित केले. सुमारे दीड महिना चाललेल्या या मेगा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सर्वोत्कृष्ट प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला. आयसीसीने आपल्या प्लेइंग-11 मध्ये 6 भारतीय खेळाडूंची निवड केली आहे.

रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे, तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेलॉर्ड कोएत्झी याला १२ वा खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर-ओपनर क्विंटन डी कॉकला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे. क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरेल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी, अशी टीम आहे.